|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अपघातात मच्छे येथील कामगाराचा मृत्यू

अपघातात मच्छे येथील कामगाराचा मृत्यू 

प्रतिनिधी/ बेळगाव

भरधाव बसची मोटार सायकलला धडक बसून मच्छे येथील एका कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी आरपीडी क्रॉसजवळ ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

बाळाप्पा मारुती होसमनी (वय 35, रा. मच्छे) असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. तो आपल्या मोटार सायकलवरुन (केए 22 ईके 6332) बेळगावकडे येत होता. त्यावेळी वडगावहून सीबीटीकडे जाणाऱया बसची मोटार सायकलला धडक बसली. या अपघातानंतर बाळाप्पाच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली. डोके फुटून त्याचा मेंदू बाहेर पडला होता.

108 रुग्णवाहिकेतून तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी आर. आर. कल्याणशेट्टी, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक सी. एच. करिकल व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली बस ताब्यात घेतली आहे. त्या युवकाच्या खिशातील ड्रायव्हींग लायसन्सवरुन त्याची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. बाळाप्पाच्या भावाने सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात मृतदेहाची ओळख पटविले. बाळाप्पा हा मच्छे येथील एका कारखान्यात कामाला जात होता.