|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबास 5 लाखांची भरपाई

मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबास 5 लाखांची भरपाई 

वडिलांकडे मंजूर भरपाईचे पत्र सादर

प्रतिनिधी/ बेळगाव

बांधकामाचे काम सुरू असताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम कामगाराच्या कुटुंबियांना पाच लाखांचा भरपाई निधी देण्यात आला आहे. बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांच्या प्रयत्नातून ही मदत उपलब्ध झाली आहे.

तारिहाळ येथील बांधकाम कामगार बाबू मल्लाप्पा कोळीकोप्प यांचे निधन झाले होते. त्याच्याकडे कामगार कार्ड होते. त्याच्या निधनानंतर कामगार खात्याकडे अर्ज करून योग्य तो पाठपुरावा केल्यानंतर कामगार खात्याचे उपायुक्त वेंकटेश सिध्दीहट्टी यांनी मंजूर झालेला भरपाईनिधी उपलब्ध करून दिला आहे. या संदर्भातील पत्र मयत बाबू याचे वडील मल्लाप्पा कोळीकोप्प यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी ऍड. एन. आर. लातूर, सहाय्यक कामगार आयुक्त नागेश, कामगार अधिकारी श्रीकांत पाटील व इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता..