|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » विविधा » मी कोणाचे पैसे चोरलेले नाहीत बँकेचे पैसे परत देण्यात तयारःविजयमल्या

मी कोणाचे पैसे चोरलेले नाहीत बँकेचे पैसे परत देण्यात तयारःविजयमल्या 

ऑनलाईन टीम / नवीदिल्ली

भारतात सुमारे नऊ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याचे भारतात प्रत्यार्पण व्हावे, यासाठी लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल आज दिला जाणार असून त्यावेळी मल्ल्या न्यायालयात हजर राहिला होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणाचेही पैसे चोरी केले नसल्याचं विजय मल्ल्याने म्हटलं आहे.

‘मी आधीही बँकांचं कर्ज फेडण्यासंबंधी बोललो होतो. कर्ज फेडण्याच्या माझ्या वक्तव्याचं प्रत्यार्पणाशी काही देणं घेणं नाही’, असं विजय मल्याने म्हटलं आहे. आपण कर्ज फेडण्याची दाखवलेली तयारी बनावट नव्हती असंही तो म्हणाला आहे.

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. मी 100 टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

2 मार्च 2017ला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..