|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » यावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ

यावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ 

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या सहा वर्षांपासून या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. यामुळे राज्यभरातून विविध संघटना आंदोलनासाठी दाखल होत होत्या. मात्र, मागील काही वर्षांच्या तुलनेत यावषी आंदोलन करणाऱया संघटनांची संख्या कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. केवळ 46 संघटनांनीच आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. गेल्या दोन दिवसांपासून फक्त चारच संघटनांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण थोडासा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही अन्यायाविरोधात किंवा समस्येसाठी आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. त्या अधिकारानुसार विविध संघटना नेहमी आंदोलन करत असतात. मागील काही वर्षांमध्ये आंदोलन करणाऱया संघटनांची संख्या वाढली होती. या आंदोलनकर्त्यांमुळे पोलिसांवर आणि प्रशासनावर ताण पडला होता. मात्र, यावषी आंदोलन करणाऱया संघटनांमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस उलटले आहेत. या दोन दिवसांमध्ये आंदोलन करण्यासाठी पोलिसांनीही काही मोजक्मयाच संघटनांना परवानगी दिली होती. मात्र, आता उर्वरित काही दिवसांमध्ये अनेक संघटना आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये शेतकरी, बांधकाम संघटना यासह इतर संघटनांचा समावेश आहे. मंगळवारी केवळ दोन संघटना आंदोलन करणार असल्यामुळे पोलिसांनी मात्र या दिवशी विश्रांती घेतली होती.

आंदोलनकर्त्यांसाठी सुवर्णसौधच्या खालील बाजूला मंडपांची उभारणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी 15 संघटनांना आंदोलन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच बरोबर के. के. कोप्प येथेही आंदोलनकर्त्यांसाठी मंडपांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी आंदोलन करणाऱया संघटनांची संख्या कमी असल्यामुळे हे सर्व मंडप मोकळे दिसू लागले आहेत. मात्र पोलिसांना रात्रंदिवस या ठिकाणी पहारा करावा लागत आहे. आता बुधवार व गुरुवारपासून अधिक संघटना आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.