|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद

गोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद 

वार्ताहर / रामनगर

गोवा-बेळगाव महामार्गाचे सिमेंटीकरण करण्यात येत असल्याने बुधवारपासून हा मार्ग पूर्णत: बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक कोणत्या मार्गाने वळविता येईल यासाठी या मार्गाची आज संबंधित अधिकारी पाहणी करणार आहेत, अशी माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी दिली.

गेले काही दिवस मार्ग बंद होणार असल्याचे ठिकठिकाणी बोर्ड लाण्यात आले होते. तसेच इंटरनेट व गुगल मॅपवरही सदर मार्ग बंद असल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही या मार्गावरून वाहने धावत होती. तसेच गोवा सरकारची परवानगी मिळाली नसल्याने रोड बंद होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र कर्नाटकच्या पोलिसांना हा मार्ग आजपासून पूर्णत: बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपनिरीक्षकांनी दिली.

 गोव्याचा मात्र रोड बंद करण्यास विरोध कायम आहे. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे रोड बंद झाला तर नागरिकांची धावपळ होईल. तसेच जिल्हाधिकाऱयांकडून आपल्याला अद्याप कोणत्याही सूचना आल्या नाहीत, असे गोवा पोलिसांनी सांगितले. मात्र आजपासून सदर मार्ग पूर्णत: बंद करणार असल्याची स्पष्ट भूमिका कर्नाटकने घेतली आहे.

तसेच रस्ता पूर्ण बंद झाला तरच रस्त्याचे काम योग्य पद्धतीने करता येणार आहे. असे दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.