|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीन, पाकिस्तानचा काळय़ा यादीत समावेश

चीन, पाकिस्तानचा काळय़ा यादीत समावेश 

वॉशिंग्टन

 : पाकिस्तान, चीन, सौदी अरेबिया आणि अन्य 7 देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे म्हणत अमेरिकेने त्यांना काळय़ा यादीत टाकले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अल नुसरा प्रंट, अरब जगतातील अल कायदा, अल शबाब, बोको हराम, हूती, आयएसआयएस, आयएसआयएस खुरासान आणि तालिबानला देखील धार्मिक स्वातंत्र्यासाठी धोकादायक मानले आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी म्यानमार, चीन, इरीट्रिया, इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सूदान, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला 1998 च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत विशेष चिंताजनक देशांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनासाठी कोमोरॉस, रशिया अणि उजबेकिस्तानला देखील विशेष देखरेख यादीत ठेवण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिली आहे.

पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त

धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱया देशांच्या यादीत समावेश करण्याचा अमेरिकेचा निर्णय एकतर्फी तसेच राजकीय स्वरुपाने प्रेरित असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. अमेरिकेचा एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरित धार्मिक स्वातंत्र्य अहवालाची यादी पाकिस्तान नाकारतो. हा अहवाल पूर्वग्रहदूषित असून याची प्रामाणिकता आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.