|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेचे खडडे बनले धोकादायक

पालिकेचे खडडे बनले धोकादायक 

प्रतिनिधी / सातारा

शहरात सध्या ग्रेड सेपरेटचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम निर्माण होताना दिसत आहे. शहरातील छोटय़ा ö मोठय़ा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. राजवाडय़ावरुन पोवईनाक्याकडे येणाऱया सीटी पोस्टासमोर तसेच जांभळी चौकात पालिकेने खड्डे खोदले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून ते खड्डे धोकादायक झाले आहेत.

 शहरात काही रस्त्यांना मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, तर काही रस्त्यांची चाळण झाली आहे. राजवाडा ते पोवईनाका हा रस्ता चांगला असलेला पहायला मिळत आहे. जांभळी चौक ते सिटी पोस्ट या परिसरात पालिकेच्या कर्मचाऱयांनी चार-पाच खड्डे खोदले आहेत. तसेच ते खड्डे उंच केल्याने दुचाकीचालकांचा अपघात होण्याची निर्माण झाली आहे. खड्डे खोदण्याचे कारण परिसरातील नागरिकांनाच समजले नाही. चांगला रस्ता का खोदला गेला असावा? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना तसेच येणाऱया प्रवाशांना पडला आहे…