|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार विक्रमसिंघे 

कोलंबो

 श्रीलंकेतील राजकीय वादात अडकलेले पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी शनिवारी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आह. आता या पदावरून बडतर्फ करण्यात आलेले रानिल विक्रमसिंघे रविवारी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असे मानले जात आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना हे विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधानपदावर नियुक्त करण्यासाठी तयार असल्याचे समजते. राष्ट्रपतींनी शुक्रवारी विक्रमसिंघे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. रविवारी सकाळी 10 वाजता पंतप्रधानपदाचा शपथग्रहण सोहळा होणार असल्याचे विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीने सांगितले. राष्ट्रपती सिरिसेना यांनी वादग्रस्त पाऊल उचलून 26 ऑक्टोबर रोजी विक्रमसिंघे यांना हटवून राजपक्षे यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे देशात घटनात्मक पेच निर्माण झाला होता. विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.