|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जीवावर उठलेल्या उजनीच्या पाण्याने नागरिक धास्तावले

जीवावर उठलेल्या उजनीच्या पाण्याने नागरिक धास्तावले 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूरसाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचे पाणी आता विष बनले असून या धरणाचे पिण्या पिल्यामुळे भविष्यात पॅन्सर, मुतखडा, पचन प्रक्रिया बिघडू शकते असा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाच्या संशोधकांच्या टिमने काढला आहे. दरम्यान, सोलापूरशहरासह, 45 गाव, उस्मानाबाद, अहमदनगर येथील रहिवशांचे आरोग्य धोक्यात आले असून या निष्कर्षामुळे येथील नागरिक हादरले आहेत. सर्वच ठिकाणी उजनीच्या विषयुक्त पाण्यावर †िभती चर्चा सुरू असून पॅन्सरच्या दारी पोहोचविण्याच्या रसायनमिश्रीत पाण्यासंदर्भात सरकार करणार काय असाच सवाल सर्वसामान्यातून होत आहे.

  दरम्यान, एकीकडे उजनीमुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असताना मात्र दुसरीकडे उजनीचे पाणी दुषित झाल्यामुळे नागरिकांना आजाराचा प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे नेमकं करायच तर काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान, 2016-17 केंद्रीय भुजल विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे, पिंपरी, चिंचवडसह जिह्यातील नदी काठाची गावे, उद्योगातून 1239.63 दशलक्ष लिटर सांडपाणी रोज वेगवेगळ्या मार्गानी भीमा नदीत येते. त्यातील फक्त 397.71 दशलक्ष लिटर एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. 541.92 एमएलडी सांडपाणी रोज भीमेत सोडले जाते.

पुणे, पिंपरी-चिंचवड  परिसरातून 1 हजार एमएलडी पाणी सांडपाणी निर्माण होते. पुणे येथील 30 एमएलडी घाण पाणी सातत्याने मिसळत आहे. यामुळे त्यातील रासायनिक घटकांमुळे भीमानदी पर्यायाने उजनी धरण अती प्रदुषित झाली आहे. पुणे, भिगवण, इंदापूर इथल्या औघोगिक वसाहतीतून दुषित पाणी धरणात येऊन मिळते. आजूबाजूच्या शेतीला दिलेली खत, किटनाशक मिश्रित पाणी धरणात येऊन धरणातील दुषित होते. सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक रासायनिक घटक आढळून आले असून हे पाणी पिण्यायोग्य नसून भविष्यात पॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो असा निष्कर्ष विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी काढलेला आहे.  त्यामुळे नागरिक धास्तवले आहे. या धोक्यातून उजनीला आणि संपूर्ण मानवी जीवनाला बाहेर काढण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना व्हावी अशीच प्रतिक्रीया नागरिकांतून होत आहे.

…तर पॅन्सरने नागरिक बळी पडतील

मागील कित्येक वर्षापासून उजनीधरणाचे पाणी पिण्यायोग्य नाही असा निष्कर्ष काढून सुध्दा प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही. रंग, औषध तसेच कारखान्यातील दुषित पाण्यामुळे उजनी दुषित होत आहे. त्यामुळे उजनीचे पाणी घातक बनत असून वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुषित पाण्यामुळे पचनक्षमता, पॅन्सर होऊ शकतो. लगेच होणार नाही हळुहळु विष प्रयोग होत असतो. त्यामुळे पॅन्सर होऊ शकतो. महापालिका शुध्दीकरण करून क्लोरीन व निजंर्तूकीचे औषध टाकतात मात्र यामुळे पूर्ण पाणी स्वच्छ होऊ शकत नाही. यासाठी ऍटोफिल्टरचा पर्याय असून नागरिकांनी तो वापरावे. पुणे, करकंब, भिगवण येथील दुषित पाणी बंद करावे. या पाण्यामुळे शेतीसाठी अपायकारक असून शेतीही खराब होते त्यासाठी कडक नियम करावे.