|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी

फोणकुली – सावर्डे येथे घरावर रेतीवाहू ट्रक कोसळून दोघे जखमी 

प्रतिनिधी/ कुडचडे

फोणकुली, सावर्डे येथे एका घरावर रेतीवाहू ट्रक कोसळल्याने घराची भरपूर हानी झाली असून घटना घडली त्यावेळी घरात झोपलेली अनुराधा वि. नाईक (52 वर्षे) ही महिला तसेच ट्रकचालक निंगप्पा बाबू हुंडरी (कर्नाटक) हे जखमी झाले आहेत. त्यांना काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोणकुली येथे सुरू असलेल्या एका संरक्षण भिंतीच्या कामासाठी सदर ट्रक रेती घेऊन आला होता. सदर ट्रकचालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनुराधा नाईक हिच्या घरावर तो कोसळला. घराचे सिमेंटचे पत्रे व ट्रकातील रेती अनुराधा नाईक हिच्यावर कोसळल्यामुळे तिचा हात प्रॅक्चर झाला आहे. त्याचबरोबर यावेळी घरात असलेला तिचा मुलगा सर्वेश नाईक याच्यावरही सदर पत्रे व रेती पडली. पण सुदैवाने त्याला जबर इजा झाली नाही. या अपघाताचा पंचनामा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशिष देसाई यांनी केला.

Related posts: