|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » साहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज

साहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज 

वार्ताहर/ सांबरा

सांबरा येथे रविवार दि. 16 डिसेंबर रोजी माय मराठी संघाच्यावतीने होणाऱया तेराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी सांबरावासीय सज्ज झाले आहेत. संमेलनासाठी लोकमान्य साहित्यनगरीत भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.

संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता गणेशनगर येथील तरुण भजनी मंडळाच्या कार्यालयासमोरून ग्रंथदिंडीने होणार आहे. ऍड. रमेश पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्ये÷ पत्रकार अशोक याळगी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. माय मराठी संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण प्रास्ताविक व स्वागत करतील. त्यानंतर संमेलनाध्यक्ष ज्ये÷ साहित्यिक व विचारवंत प्रा. हरी नरके यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

दुसऱया सत्रात दुपारी साडेबारा वाजता ज्ये÷ अभिनेते व बेळगावचे सुपुत्र प्रसाद पंडित यांचे अभिनय क्षेत्रातील अनुभव कथनाचा कार्यक्रम होईल. दुपारी दीड ते अडीच यावेळेत निसर्गरम्य आमराईत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल.

तिसऱया सत्रात दुपारी अडीच वाजता आमदार बच्चू कडू यांचे शेतकऱयांचे ज्वलंत प्रश्न आणि निवारण यावर मार्गदर्शन करतील. तर शेवटच्या चौथ्या सत्रात पावणेचार वाजता कवी संमेलन होईल. कवी मकरंद सावंत (मुंबई) अनंत राऊत (पुणे) हे बहारदार कविता सादर करणार आहेत. या सत्रात मान्यवरांचा सत्कार व संमेलनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना साहित्यिकांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शिवाजी सुंठकर, भाऊ गडकरी, शिवप्रति÷ान बेळगावचे अध्यक्ष किरण गावडे, गव्ह. कॉन्ट्रक्टर आर. एम. चौगुले, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, काशिनाथ धर्मोजी, माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई, परशराम बेडका, वाय. बी. ताशिलदार, जोतिबा तिप्पान्नाचे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सवलतीच्या दरात पुस्तके

संमेलनात ज्ये÷ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘भारतीय भाषा व साहित्य’ हे दोनशे रुपयांचे पुस्तक सवलतीच्या दरात केवळ शंभर रुपयांना देण्यात येणार आहे. या पुस्तकाच्या केवळ पन्नास प्रतिच उपलब्ध असणार आहेत.