|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणप्रश्नी मगोने दिलेली मुदत संपली, आता सारवासारव

खाणप्रश्नी मगोने दिलेली मुदत संपली, आता सारवासारव 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी करीत सरकारमधील घटकपक्ष असलेल्या मगो पक्षाने सरकारला 15 डिसेंबरची मुदत दिली होती. मात्र या मुदतीत खाणीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने मगोने आता सारवासारव चालविली आहे. पंतप्रधान कार्यालयात फाईल पोचल्याने मुदत वाढविण्याची भाषा आता मगो नेते करत आहेत.

खाणी लवकर सुरू न झाल्यास प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्यासही मागे राहणार नाही, असे मगो प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी खाण अवलंबितांसमोर स्पष्ट केले होते. चर्चा खूप झाली व आश्वासनेही खूप झाली. आता कृती हवी, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले होते. तर सरकारमधील मगोचे नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांनी 15 डिसेंबरनंतर निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट केले होते. मात्र 15 डिसेंबर उलटून गेला तरी केंद्र आणि राज्य सरकारनेही कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्या भाजपचीच गोची झाली आहे.

Related posts: