|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हर्णैत सापडला 5 फुटी गोबरा मासा

हर्णैत सापडला 5 फुटी गोबरा मासा 

प्रतिनिधी/ दापोली

गेल्या महिन्यात दापोली तालुक्यातील हर्णै येथे गेदड मासा सापडल्याचे उदाहरण ताजे असतानाच गुरूवारी येथे 5 फुटी गोबरा मासा सापडला. हा मासा पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

  गोबरा मासा हा सर्वसाधारणपणे 200 ते 300 ग्रॅम वजनाचा असतो. जर तो 1 ते 15 किलोपर्यंत सापडला तर त्याला परदेशात खाण्यासाठी मागणी असते. यावेळी तो साधारणपणे 250 रूपये किलो एवढय़ा भावाने विकला जातो. यापेक्षा मोठा मासा असेल तर तो तत्काळ शिजवून खाण्यास योग्य नसतो, असा समज आहे. गुरूवारी सापडलेला गोबरा मासा हा पाच फूट लांब व साधारणपणे 90 किलोचा असल्याने त्याला केवळ दीड हजार रूपयांपर्यंतच भाव मिळणार आहे. हा मासा स्थानिक मच्छिमारांनी विकत घेतला. त्याचे लहान-लहान तुकडे करून त्याला मिठ लावून ते सुकवण्यात येणार आहेत. यानंतर त्याची खाऱया माशांच्या मार्केटमध्ये विक्री करण्यात येणार असल्याची माहिती हर्णैचे माजी सरपंच व मच्छी व्यावसायिक असलम अकबाणी यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

..