|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दुचाकी चोरी प्रकरणी राजवाडय़ावर तिघांना अटक

दुचाकी चोरी प्रकरणी राजवाडय़ावर तिघांना अटक 

प्रतिनिधी/ सातारा

राजवाडा परिसरात इतर वाहनांना कट मारून भरधाव दुचाकी चालवणारा आरोपी विश्वास गुजर याला पालिसांनी संशयावरून ताब्यात घेवून विचारपुस केली असता. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अटक केली आहे. त्याच्याकडुन व त्याच्या अन्य साथीदारांकडुन अन्य काही चोरीच्या दुचाक्या हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस उपअधिक्षक मिलिंद शिंदे हे पोलीस कर्मचाऱयांसह राजवाडा परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक युवक सिल्व्हर रंगाची एक्सेस मोटार सायकलवर इतर मोटार सायकलला कट मारून जात असल्याचे दिसले. त्याचा संशय आल्याने मिलिंद शिंदे यांनी त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांच्या मदतीने पकडले. त्याच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना, गाडीची कागदपत्रे आदींची मागणी केली असाता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास नाव विचारले असता स्वतःचे नावही अडखळ अडखळत विश्वास हणमंत गुजर (वय 28 रा. साईप्रसाद अपार्टमेंट प्रतापगंज पेठ सातारा) असे सांगितले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता गाडीवरील नंबर बनावट असल्याचे त्याने सांगितले.. गाडीचा खरा नंबर एम एच 11 बी एफ 3681 असा असल्याचे सांगितले. तसेच ती मोटार सायकल मनिष काकडे (रा. फलटण) व सोन्या खवळे (रा. नामदेववाडी सातारा) यांनी चोरून तिची विक्री करण्यासाठी मूळ रजिस्टेशन नंबरमध्ये बदल करून आपणाकडे विक्रीसाठी दिली असल्याचे सांगितले.  

तसेच त्या दोघांनी आणखी एक पांढऱया रंगाची ऍक्टीव्हा मोटार सायकल चोरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे. त्या गाडीचा मूळ रजिस्टेशन नंबर एम एच 11 सी एम 1402 असा असल्याचे आढळून आले आहे. या तिन्ही आरोपींकडे पोलीस चौकशी करत असून आणखी काही गाडय़ा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून परिविक्षाधिन पोलीस उपअधिकक्षक मिलींद शिंदे व त्यांच्या सहकाऱयांचे अभिनंदन करण्यात आले.