|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजपा नेत्यांना आदेश

शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजपा नेत्यांना आदेश 

ऑनलाइन  टीम / नवी दिल्ली :

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा एक पाऊल मागे जाताना दिसत आहे. तीन राज्यांत झालेल्या पराभवामुळे भाजपाने मित्रपक्षांच्या बाबातीत नमती भूमिका घेतल्याचं चित्र आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा वाटाघाटी करताना मित्रपक्ष दुखावले जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहे. याचा परिणाम राज्यातही झाला असून सत्तेत असून सतत विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला दुखावलं जाऊ नये असा आदेशच भाजपा नेत्यांना देण्यात आला आहे.

सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, जागा वाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नये असा आदेश देण्यात आला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनीच नेत्यांना हा आदेश दिला आहे. शिवसेनेने आपल्यावर कोणतीही टीका केली तरी त्यांना प्रत्युत्तर देताना किंवा कोणतीही टीका करताना संयम बाळगा असं नेत्यांना बजावण्यात आलं आहे. शिवसेनेविरोधात बोलू नका असाच थेट आदेश दिल्याचं कळत आहे.