|Thursday, February 21, 2019
You are here: Home » leadingnews » सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

राज्य सरकारी कर्मचाऱयांना नववर्षाची भेट मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असून सरकारी कर्मचाऱयांना त्याचा लाभ मिळणार आहे.

 

 

सरकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात के.पी.बक्षी समितीने एक अहवाल तयार केला होता. के.पी. बक्षी समितीच्या या अहवालावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांच्या वेतनात महिना 5 हजारापासून 14 हजारापर्यंत वाढ होणार आहे.

 

 

फेब्रुवारी महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱयांना ही नवीन वेतनवाढ लागू होईल. सातव्या वेतन आयोगाचा 17 लाख सरकारी कर्मचाऱयांना लाभ मिळणार आहे. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर 21 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. परंतु 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पगारात वाढ होणार आहे. तसेच 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱयांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे

 

Related posts: