|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » ’शनिवारी केंद्रीय संरक्षण मंत्री बेळगावात’

’शनिवारी केंद्रीय संरक्षण मंत्री बेळगावात’ 

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या शनिवारी 29 रोजी बेळगाव दौऱयावर असणार आहेत.सकाळी 10ः30 वाजता दिल्लीहून विशेष विमानाने बेळगाव विमान तळावर येणार आहेत. तिथून त्या हेलिकॉप्टर द्वारे विजापूर जिह्यातील भारतीय संस्कृती विकास या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.दुपारी 1ः45 वाजता त्या बेळगाव विमान तळावर पुन्हा परतणार असून दुपारी 2ः30 ते 4ः30 च्या दरम्यान बेळगावातील संरक्षण खात्याच्या कार्यालयात होणाऱया कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुन्हा सायंकाळी 4ः30 वाजता दिल्लीकडे रवाना होतील.