|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको – कविता लंकेश

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको – कविता लंकेश 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे सीबीआयकडे देऊ नये अशी मागणी कविता लंकेश यांनी केली आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात प्रगती केली आहे. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे. ‘जर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली तर आपण स्वतः या प्रकरणात पक्षकार होऊ आणि या निर्णयास सुप्रीम कोर्टात विरोध करू,’ असा इशारा कविता लंकेश यांनी दिला आहे.

गौरी लंकेश, एम.एम. कलबर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत एकसूत्रता दिसत असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मात्र आता कविता लंकेश यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू नये ही मागणी केली आहे. याप्रकरणी 16 आरोपींना अटक झाली आहे. दोन आरोपपत्रे दाखल झाली आहेत. इतका तपास पुढे गेला असताना या टप्प्यावर प्रकरण सीबीआयकडे देण्यात काहीच अर्थ नाही,’ असे कविता लंकेश यांनी म्हटले आहे.