|Sunday, June 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » एका स्वातंत्र्यसैनिकाची अशीही ‘शोकांतिका’

एका स्वातंत्र्यसैनिकाची अशीही ‘शोकांतिका’ 

‘द म्युल’ चित्रपटामध्ये एका स्वातंत्र्यसैनिकाची उतारवयातली गोष्ट पाहायला मिळते. 90 वर्षांचे अर्ल स्टोन हे पूर्वी स्वातंत्र्यसैनिक होते. पण आता त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. पैसे कमाविण्यासाठी ते एका ड्रग्ज डिलरशी नाईलाजाने हातमिळवणी करतात आणि कोकेनची तस्करी करतात. ते वयोवृद्ध असल्याने त्यांच्यावर संशय घेतला जात नाही. पण एके दिवशी पोलिसांना संशय येतो आणि ते अर्ल यांना अटक करतात. त्यानंतर पुढे काय होते हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. या चित्रपटात अर्ल स्टोन ही व्यक्तिरेखा क्लिंट इस्टवुड हे साकारणार आहेत. याशिवाय ब्रॅडली कूपर, मायकल पीएना, ऍर्ण्ड गार्शिया, लॉरेन डीन या कलाकारांच्याही भूमिका आहेत. क्लिंट इस्टवूड यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सॅम डॉलनिक यांच्या सिनोला कार्टेल-नायन्टी इयर ओल्ड म्युल या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे.