|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संपामुळे रत्नागिरीत व्यवहार कोलमडले!

संपामुळे रत्नागिरीत व्यवहार कोलमडले! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

भारत सरकारच्या कामगारविरोधी व बँकींग उद्योगातील जनहितविरोधी धोरणांविरोधातील संपात मंगळवारी रत्नागिरीतील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, पोस्ट कर्मचारी आयुर्विमा, सर्वसाधारण विमा यांच्यासह केंद्र व बहुतांशः राज्य सरकारी कर्मचाऱयांनी सहभाग घेतला. या कर्मचाऱयांच्या संपाचा परिणाम येथील दैनंदिन व्यवहारांसाठी येणाऱया नागरिकांना बसला.

  सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपामध्ये आयटक, इंटक, सीटू, हिंद मजदूर सभा यासह एकूण 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना तसेच या संघटनांशी संलग्न सर्व क्षेत्रातील संघटना सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सरकारी संघटनांनी या संपाला फक्त पाठिंबा जाहीर केला होता.  बँकींग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संपात सहभागी झाल्याने रत्नागिरीतील बहुतांशी राष्ट्रीयकृत बँका बंद होत्या.

  कामगार संघटनांनी वर्षानुवर्षे लढून मिळवलेले हक्क व कामगार कायद्यातील कामगार हितांच्या तरतुदी बदलण्याचे भारत सरकारचे धोरण आहे. सर्व कायमस्वरुपी कामांचे कंत्राटीकरण केल्यामुळे देशातील रोजगार कमी होत असल्याचे म्हणणे आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई शिगेला पोहोचली आहे. वाढती महागाई कमी करावी तसेच बँका व इतर सार्वजनिक आस्थापनांकडून पुरेशा प्रमाणात नोकर भरती केली जावी, किमान वेतन कायद्यात बदल करुन ते किमान रु.18,000 करावे, बोनस कायद्यातील मर्यादा काढून सर्व कर्मचारी बोनस मिळण्यास पात्र करावेत, यासारख्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत.  

रत्नागिरीच्या बँक कर्मचाऱयांनी बँक ऑफ इंडिया, मारुती मंदिर शाखा येथे मंगळवारी सकाळी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा जोरदार निदर्शने करत निषेध केला. या निदर्शनांचे व संपाचे नेतृत्व विनोद कदम, विनोद आठवले, राजेंद्र गडवी यांनी केले. पहिल्या दिवशीचा संप रत्नागिरीतही यशस्वी झाला. या संपाची झळ रत्नागिरीतील नागरिकांना बसली.