|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » माजी आमदारांची तिसऱया पुलाला भेट

माजी आमदारांची तिसऱया पुलाला भेट 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा विधीकार दिनाच्या संध्याकाळी गोव्याच्या माजी आमदारांनी मांडवीवरील तिसऱया पुलाला भेट दिली. पुलाची पाहणी केल्यानंतर माजी आमदारांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिसऱया पुलासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले.

दुपारी 3 वा. या सर्व माजी आमदारांनी पुलाला भेट दिली. राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांनी त्यांचे स्वागत केले. पणजीचे माजी आमदार बबन नाईक, ऍड. रमाकांत खलप, सदानंद शेट तानावडे, व्हिक्टर गोन्साल्वीस, निर्मला सावंत, संगीत परब, तिओतीन परेरा, धर्मा चोडणकर, सदानंद मळीक, अनंत शेट, पांडुरंग राऊत व अन्य माजी आमदारांची उपस्थिती होती.

सकाळी विधानसभा संकुलात विधीकार दिन सोहळा झाला. या सोहळ्य़ात माजी आमदारांनी भाग घेतला.