|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Automobiles » पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार Harley-Davidsonच्या नव्या बाइक्स

पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार Harley-Davidsonच्या नव्या बाइक्स 

ऑनलाइन टीम / मुंबई  :

लास वेगास इथे सुरु असलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे एकापेक्षा एक आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित प्रॉडक्ट सादर करत आहेत. यात प्रसिद्ध बाइक कंपनी Harley-

Davidson सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. Harley-Davidson ने या शोमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक मोपेड कॉन्सेप्ट सादर केले. भविष्यात Harley-Davidson हे दोन्ही मॉडेल लॉन्च करणार याकडे पाऊल मानलं जात आहे. या दोनमधील एक बाइक इलेक्ट्रिक स्कूटर आहे तर एक इलेक्ट्रिक टू-व्हीलर.

गेल्यावर्षी Harley-Davidson कडून जाहीर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या स्केचेससोबत हे दोन्ही मॉडेल फार मिळते-जुळते आहेत. आणि दोन्हीही मॉडेल इलेक्ट्रिक मोटर सोबतच येणार आहे. Harley-Davidson च्या या दोन्ही मॉडेलची CES 2019 मध्ये चांगलीच प्रशंसा केली गेली.इतकेच नाही तर या शोमध्ये आलेले प्रेक्षक ही दोन्ही डिझाइन पाहून चांगलेच हैराण झालेत. सध्यातरी कंपनीकडून या दोन्ही टू-व्हीलरची झास्त माहिती समोर आली नाही. मोपेडबाबत सांगायचं तर Harley-Davidson ची ही स्कूटर रनिंग बोर्डवर तयार करण्यात आल्यासारखं वाटतं. स्कूटरची सिंगल पीस सीट बॅटरीच्या वरच्या बाजूला लावण्यात आली आहे.