|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » सलग दुसऱया दिवशी बाजारात घसरण

सलग दुसऱया दिवशी बाजारात घसरण 

सेन्सेक्समध्ये 96 अंकानी घसरण, निफ्टी10,800 नी खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय बाजारात सप्ताहातील शेवटच्या दिवशी घसरण झालेली आहे. मागील सप्ताहात दि.14 व 15 नंतर डिसेंबर तिमाहीच्या नफ्या तोटय़ाचे आकडे सादर होणार असल्याचा अंदाज तज्ञाांनी मांडला होता. 10 जानेवारीपासून कंपन्यांच्या नफा कमाईचे अहवाल सादर होता आहेत. त्यात गुरुवारी टीसीएस कंपनी व शुक्रवारी इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपन्याची आकडेवारी सादर करण्यात आलेली आहे.परंतु बाजारातील तेजी मागील दोन दिवस कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले आहे.

भारतीय बाजारात शुक्रवारी निर्देशाकांत 96 अंकानी कमजोर होत 36,191.87 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशाकांत 26.65 अंकनी घसरण होत 10,794.95 वर बंद झलेला आहे. बाजारात गुरुवारी बँकिंग क्षेत्रातील कमजोर कामगिरीचा फटका भारतीय बाजाराला बसला होता. आणि शुक्रवारी बाजारातील घसरणीत इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टीसीएस, येस बँक आणि एल ऍण्ड टी यांच्या निर्देशाकांत मोठी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली.

दुसऱया बाजुला आयटीसी, ओन्जस, वेदान्ता , इन्फोसिस, ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी यांच्या शेअर्समध्ये तेजीची पहावयास मिळाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत शुक्रवारी कमजोर झाली असल्याने डॉलरचे मुल्ये 70.55 ने वधार झाली असल्याची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे भारतातील महत्वाच्या  शहरांमध्ये खनिज तेलाच्या किंमतीत 19 पैशांनी वाढ झाली, त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दरात वाढ होण्यावर झाला असल्याचे पहावयास मिळाले.