|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गायक परिवार आयोजित हिंदी गीत कार्यक्रम

गायक परिवार आयोजित हिंदी गीत कार्यक्रम 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

नूतन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ गायक परिवार प्रस्तुत ‘उमंग 2019’ या कॅरिओके संगीतावर आधारीत दर्जेदार, सदाबहार गीतांचा कार्यक्रम रामभाई सामाणी हॉल, उद्यमनगर  येथे उत्साहात सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार संजय कुंभार, उद्योगपती अजित आजरी, शिवाजीराव यादव व गायक परिवाराचे संस्थापक डॉ. राजकुमार पोळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी ताज मुल्लाणी यांची मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जायंटस् मेट्रोचे अध्यक्ष शिवाजीराव यादव, प्रा. मोहन गावडे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात रवी सूर्यवंशी, डॉ. उदयकुमार भाट, अजित आजरी, यशोदा आजरी, सरोज भाट,सुनिल पवार, राहुल मुचंडीकर, जास्वंदी कुलकर्णी, केदार कुलकर्णी, स्वरदा देसाई, सावन रावळकर, शैला तावरे, रोहित शिरगावकर, पंडित घोरपडे, अविनाश कर्णिक, अनुपमा वायचळ, भाग्यश्री यादव, सविता देसाई, कुमार पाटील, रमेश गुंजाळ, अंजली धारिया, अंजली दुर्गाई, धनश्री नाजरे, जान्हवी म्हावके, सुनिता कुलकर्णी यांनी बहारदार गीते सादर करुन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन सौ. श्रुती इनामदार यांनी केले.