|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काश्मीरमधील हल्ल्यात मेजरसह जवान हुतात्मा

काश्मीरमधील हल्ल्यात मेजरसह जवान हुतात्मा 

श्रीनगर / प्रतिनिधी

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्हय़ातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. तसेच दहशतवाद्यांकडून दोन आईडी स्फोटही घडवण्यात आले. या स्फोटात घटनेत लष्कराचे एक मेजर आणि एक जवान असे दोघे हुतात्मा झाले. याआधी मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय सेनेच्या गस्त घालणाऱया पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर ऍक्शन टीमने गोळीबार सुरू केल्यानंतर काही वेळातच दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवल्याची माहिती समोर आली आहे.  या स्फोटानंतर दहशतवादी लपले, मात्र लष्कराने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आल्याचे समजते. यावेळी झालेल्या चकमकीत एका मेजरसह एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात शुक्रवारी दिवसभर वेगवेगळय़ा कारवाया सुरू होत्या. रुपमती आणि पुखराणी या दोन ठिकाणी स्फोट झाले. पहिला स्फोट दुपारी साडेचारच्या सुमारास तर दुसरा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. हे दोन स्फोट नियंत्रण रेषेजवळच्या दहशतवाद्यांनी घडवल्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली. या घटनेमध्ये तीन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले.