|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अडचणीवर आंतरिक उर्मीतून मात करावी

अडचणीवर आंतरिक उर्मीतून मात करावी 

शारदा व्याख्यानमालेत अनघा मोडक यांचे विचार, पर्वरी येथे आयोजन

प्रतिनिधी/ पर्वरी

जीवनात येणाऱया अडचणींवर दु:खाचा बाऊ न करता आंतरिक उर्मीतून मात करावी तसेच वेदना या सहवेदना म्हणून जाणून पुढे जावे तेव्हाच मनाची मंदिरे बनतात, असे विचार अनघा प्रदीप मोडक यांनी 11 व्या शारदा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना मांडले.

येथील विद्या प्रबोधिनी हायस्कूलच्या पाटंगणावर भारत विकास परिषद व जनहित मंडळ पर्वरी यांच्या संयुक्तविद्यमाने शारदा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये सेवाभावी व्यक्तिमत्त्व, चिंतनशील लेखक, पत्रकार यांना पुष्प गुंफविण्यात आमंत्रित केले जाते. या 11 व्या वर्षी पहिले पुष्प जीना इसिका नाम है या विषयावर अनघा मोडक यांनी गुंफले.

यावेळी मोडक यांनी जीवनातील अनेक प्रसंगावरील आपले अनुभव व्यक्त करून श्रोत्यांच्या मनावर परिणामकारक व ओघवी भाषाशैलीने कथन करून वाहवा मिळवली. आपले जीवन भरभरून जगतो काय. जगण्याचे विविध आयाम आहेत. जगणे ही कला आहे. कला शिकताना काळावर मात करण्यासाठी जगतो, वागतो, असे त्या म्हणाल्या.

अनघा मोडक यांनी या व्याख्यानमालेत अनेक उदाहरणांसह माहिती कथन केली. त्यात बहिणाबाई चौधरी, स्वीमी विवेकानंद यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी दिलेली शिकवण व आशीर्वाद यांचाही प्रामुख्याने उल्लेख केला. टाकऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनताना. त्यामुळे टाकाऊ आणि टिकाऊ यात तुलना करू नका, असे त्या म्हणाल्या.

प्रारंभी व्याख्यानमालेचे उद्घाटन अनघा मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे विजयकुमार मंत्रवादी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप लोटलीकर, जनहित मंडळाचे अध्यक्ष भिवा मळीक, संयोजक डॉ. सीताराम कोरगावकर, उपस्थित होते. एल. डी. सामंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम सादर केले. सूत्रसंचालन ज्योती चिपकर यांनी केले. पसायदान उर्जिवा यांनी सादर केले.