|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन 

ऑनलाईन टीम /मुंबईः  

अफलातून टायमिंग आणि अंगभूत अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे आज पहाटे निधन झाले . ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळं अभिनयाच्या क्षेत्रातील एक हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मराठी, इंग्रजी रंगभूमी, मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि जाहिराती अशा सर्वच माध्यमांत प्रधान यांनी काम केलं होतं. ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील खट्याळ आजोबा, ‘जब वुई मेट’मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तसंच, दूरदर्शन वाहिनीवरील ‘गजरा’ कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता. 

Related posts: