|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुणगे भगवती देवीचा जत्रोत्सव 20 पासून

मुणगे भगवती देवीचा जत्रोत्सव 20 पासून 

प्रतिनिधी/ मुणगे

मुणगे येथील श्री भगवती देवीचा जत्रोत्सव 20 ते 24 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या कालावधीत सकाळी 11 वा. धार्मिक विधी, देवीला साडी नेसवून अलंकार घालणे, नौबत, गाव गाऱहाणे व ओटी भरणे, सायंकाळी 5 वा. गोंधळी, रात्री 7 वा. नौबत, रात्री 12 वा. पुराण प्रवचन, 12.30 वा. पालखी, मध्यरात्री दीड वा. गोंधळ/कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दिवसभर संगीत भजने होणार आहेत. पाचव्या दिवशी सकाळी 9 वा. पासून संगीत भजने, मध्यरात्री दीड वा. पुराण प्रवचन, पहाटे 3 वा. पालखी सोहळा, नवसांची गाऱहाणी, कीर्तन आणि लळिताच्या कार्यक्रमाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. 26 रोजी सकाळी 11 वा. त्रैवार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. रात्री 10 वा. ‘माझ्या अंगणी नाचते दुसऱयाची बायको’ हे विनोदी दोन अंकी नाटक होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.