|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मटका अड्डय़ांवर छापे, चौघा जणांना अटक

मटका अड्डय़ांवर छापे, चौघा जणांना अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

गुन्हे तपास विभाग व सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी मटका अड्डय़ांवर छापे टाकुन चौघा जणांना अटक केली आहे. भाजीमार्केटजवळील इंदिरा कॅन्टीन नजीक तिघा जणांना तर भांदुर गल्लीजवळ एका मटकाबुकीला अटक केली असून त्यांच्या जवळून 28 हजार 135 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या.

गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी सायंकाळी भाजीमार्केटजवळील इंदिरा कॅन्टीन नजीक सुरु असलेल्या एका मटका अड्डय़ावर छापा टाकून तिघा जणांना अटक केली. गजानन शशिकांत गर्डे (रा. कामत गल्ली), शेखर राजू शेट्टी, (रा. रविवारपेठ), बंटी उर्फ प्रतिक मोहन जाधव (रा. कामत गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्याजवळून 1385 रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले असून या तिघा जणांविरुध्द मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या तिघा जणांविरुध्द कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तर शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भांदुर गल्ली येथील शिवभवन जवळ सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनी छापा टाकून प्रमोद मनोहर धामणेकर (रा. भांदुर गल्ली) याला अटक केली आहे. त्याच्याजवळून 15 हजार 50 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या प्रमोदने आपण विनोद मॅगीनमनी या बुकीला चिठ्ठय़ा पोहोचवत असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे प्रमोद बरोबरच विनोदवरही खडेबाजार पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.