|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जखमी घुबडाला युवकांकडून जीवदान

जखमी घुबडाला युवकांकडून जीवदान 

वार्ताहर / आचरा:

आचरा वरचीवाडी येथील प्रफुल्ल घाडी यांच्या घराशेजारील कलम बागेत आढळलेल्या जखमी घुबडाला त्यांनी आपल्या सहकाऱयांसह भटक्मया कुत्र्यांच्या तावडीतून सोडवित पाणी पाजून जीवदान दिले. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक विजय पांचाळ घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अवस्थेतील घुबडाची पाहणी करून ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून घुबडावर उपचार घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वरचीवाडी येथील प्रफुल्ल घाडी व त्यांचे मित्र जीतेंद्र घाडी, नीलेश घाडी काम करीत होते. घराला लागूनच असलेल्या कलम बागेत जोरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने प्रफुल्ल घाडी व त्यांचे मित्र जीतेंद्र, निलेश हे पाहायला गेले असता, त्यांना एक मोठे घुबड जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी आणत पाणी पाजले. याबाबत माहिती मिळताच पत्रकार परेश सावंत यांनी कांदळगाव विभागाचे वनरक्षक विजय पांचाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना जखमी घुबड ताब्यात घेऊन उपचार करण्याची विनंती केली. काही वेळातच वनरक्षक पांचाळ आले व त्यांनी घुबड ताब्यात घेतले. दुर्मिळ होत चाललेल्या घुबड जातीच्या पक्षाला जीवदान देण्याचे काम आचरा येथील युवकांनी केले.