|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तुबची योजनेचे पाणी जतला देण्यासाठी पाठपुरावा करणार : राज्यपाल

तुबची योजनेचे पाणी जतला देण्यासाठी पाठपुरावा करणार : राज्यपाल 

प्रतिनिधी/ जत

जत तालुक्यातील वंचित 42 गावांना वरदान ठरणाऱया कर्नाटकातील तुबची बबलेश्वर उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी देण्यासंदर्भात तोडगा काढू अशी गवही देऊन याप्रश्नी लवकरच दोन्ही राज्यांची बैठक बोलूवू, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली

जत तालुक्याला सीमेवर आलेल्या तुबची बबलेश्वर उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्व भागातील 42 गावांना मिळावे साठी सांगलीचे शिक्षण सभापती तमन्ना रवी पाटील यांनी मोठा जोर लावला आहे रविवारी भाजपा नेत्या सौ. नीताताई  केळकर यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील पदाधिकारी यांनी मुंबईत राज्यपाल भवनमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी येरळा सोसायटीचे नारायण देशपांडे शिक्षण सभापती तमन्ना रवी पाटील ऍड. श्रीपाद अष्टेकर, जिप अध्यक्ष
संग्रामभाऊ देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते

शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांना तुबची योजनेचा सविस्तर कृती आराखडा सादर करून योजनेची माहिती दिली यावेळी राज्यपालांशी बोलताना रवी पाटील म्हणाले कर्नाटक सरकारने राबवलेल्या तुबची योजनेचे पाणी आजच्या सीमेवर आले  आहे , शिवाय आज वर महाराष्ट्र सरकार दुष्काळजन्य परिस्थिती मध्ये कर्नाटक ला सतत कृष्णा नदीतून पाणी देत आहे आजमितीस महाराष्ट्राने कर्नाटक ला आठ टीएमसी पाणी दिली आहे, पण कर्नाटक सरकार कडून सीमाभागात कधीही पाणी सोडण्यात आले नाही

दरम्यान, यंदा जत तालुक्यावर यंदा दुष्काळाची छाया गडद आहे. तालुक्यात पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे अशा स्थितीत दोन्ही राज्यांनी माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना आधार दिला पाहिजे जतला तुबची योजनेतून दोन टीएमसी पाणी मिळावे म्हणून आम्ही गेल्या दोन महिन्यापासून सतत पाठपुरावा करीत आहोत

त्या अनुषंगाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन घेतली आहे,  दोन्हीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पाटबंधारे मंत्री यांनी या योजनेसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे परंतु हा प्रश्न तातडीने सोडवायचा झाल्यास कर्नाटक महाराष्ट्र असा पाणी वाटपाचा आंतरराज्य कराड होणे आवश्यक आहे यासंदर्भात राज्यपाल म्हणून आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती तमन्ना रवी पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे

    लवकरच तोडगा काढणार

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जतच्या शिष्टमंडळाचे सगळे म्हणणे ऐकून घेतले, अर्धा तास या योजनेवर त्यांनी गांभीर्याने सविस्तर चर्चा केली यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले, जत तालुक्यातील 42 गावांना पाणी देण्यासाठी सरकारचा दुवा म्हणून निश्चितच तोडगा काढू तसेच कर्नाटक महाराष्ट्र असा आंतरराज्य करार करण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक बोलवून यासंदर्भात लगेचच पत्रव्यवहार करणार असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले.