|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » रेल्वेत महिलांवर केमिकल हल्ला करणार भामटा अटकेत

रेल्वेत महिलांवर केमिकल हल्ला करणार भामटा अटकेत 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या अंगावर केमिकल टाकणाऱया तरुणाला अटक करण्यात आली आहे. निर्भया पथकाने आज अंधेरी स्थानकात रंगेहाथ आरोपीला पकडले आहे. या आरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केलेले आहेत.

भूज एक्स्प्रेसमध्ये सुरतच्या दरियाबाई चौधरी यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, रेल्वेतून प्रवास करणाऱया महिला प्रवाशांवर केमिकल अटॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लागोपाठ दोन गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांवरही असा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, साध्या गणवेशातील पोलीस आरोपीचा शोध घेत होते.दरम्यान आज रंगेहाथ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.