|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्सच्या नफा कमाईने बाजारात उत्साह

रिलायन्सच्या नफा कमाईने बाजारात उत्साह 

सेन्सेक्स 12.53 वधार,

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडीचा फायदा शुक्रवारी भारतीय बाजाराला झाला आहे. परंतु काही प्रमाणात बाजारात अस्थिर वातावरण राहिले होते. बीएसईचा निर्देशांकात 12.53 अंकानी वाढ होत 36,386.61 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये  1.75 अंकानी वधार होत 10,906.95 वर बंद झाला आहे. बाजारात मोठी घसरण किंवा मोठी तेजी न नोंदवता संथपणे बाजाराचा प्रवास झालेला आहे. त्यात कंपन्याचा तिमाही अहवाल सादर करण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधान असमाधान असल्याच्या वातावरणाची नोंद करण्यात आली.

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून गुरुवारी उशिरा तिमाहीची आकडेवारी सादर करण्यात आली असून कंपनीने विक्रमी नफा कमाईची नोंद केल्याची माहिती तिमाही आकडेवारीतून समोर आले. यांचा पुर्ण फायदा शुक्रवारी दिवसभरातील व्यवहारात झाल्याचे दिसून आले कंपनीच्या  शेअर्स विक्रीत 4..43 टक्क्यांनी तेजी नोंदवण्यात आली. कारण भारतातील खासगी कंपन्यांमध्ये 10 हजार कोटी रुपयाचा नफा कमाई करण्यात सर्वोच्च स्थान पटकावणारी रिलायन्स ही पहिलीच कंपनी ठरली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा, एचसीएल टेक, ओन्जस , एशियन पेन्टस वेदान्ता, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, मारुती आणि टीसीएस यांचे निर्देशांक 1.41 अंकानी वधारलेत. तर सन फार्माला सर्वात मोठा फटका बसला असून 8.58 टक्क्यांनी शेअर्समध्ये घसरण झाली असून मागील सहा वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे.

भारती एअरटेल, एल ऍण्ड टी ,ऍक्सिस बँक, येस बँक, आयटीसी, टाटा मोटार्स, आणि पॉवरग्रीड यांच्या निर्देशांकात 6.24 टक्क्यांनी घसरणीची नोंद करण्यात आली.

सप्ताहातील प्रवास

बीएसईच्या प्रमुख 30 कंपन्यांचा सप्ताहात निर्देशांक 378.77 अंकानी तेजी नोंदवण्यात आली आहे. तर निफ्टीत 112 अंकाची वधार नोंदवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या दर वाढीचा परिणाम भातीय शेअर बाजारावर झाल्याचे पहावयास मिळाले.