|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वसंत सावंत उगवाई काव्योत्सव अध्यक्षपदी कवी गणेश विसपुते

वसंत सावंत उगवाई काव्योत्सव अध्यक्षपदी कवी गणेश विसपुते 

वसंत सावंत उगवाई काव्योत्सव : अध्यक्षपदी कवी गणेश विसपुते : सिंधुदुर्गातील कवींना सहभागी होण्याचे आवाहन : आवानओल प्रतिष्ठानतर्फे 26 जानेवारीला कणकवलीत आयोजन

प्रतिनिधी : कणकवली:

येथील आवानओल प्रति÷ानतर्फे आयोजित नवव्या कविवर्य वसंत सावंत स्मृती उगवाई काव्योत्सवाच्या अध्यक्षपदी मराठीतील नामवंत कवी गणेश विसपुते (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. 26 जानेवारीला सायंकाळी 5.30 वा. येथील हॉटेल गोकुळधामच्या युनिक ऍकॅडमी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून निवृत्त वरि÷ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

कोकणातील प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कवींना हक्काचा मंच मिळावा, यासाठी कविवर्य सावंत यांनी तळकोकणात कवितेची चळवळ त्याकाळी सुरू केली. त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात आणि नव्या जाणिवांच्या कवींची काव्यगुणवत्ता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावी, यासाठी आवानओल प्रति÷ानतर्फे दरवषी उगवाई काव्योत्सव आयोजित करण्यात येतो. यावषीच्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात नांदेड येथील कवयित्री सुचिता खल्लाळ यांना त्यांच्याप्रलयानंतरचीतळटीपया काव्यसंग्रहासाठी कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार, तर ठाणे येथील कवी अविनाश गायकवाड यांना त्यांच्याखिंडीत गोठलेलं सुखया काव्यसंग्रहासाठी कविवर्य . भा. धामणस्कर काव्य पुरस्कार विसपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. दुसऱया सत्रात खुले कवी संमेलन प्रसिद्ध मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात नव्याजुन्या कवींचे कविता वाचन होणार आहे. गणेश विसपुते हे समकालीन मराठी कवितेतील महत्वाचे नाव असून प्रसिद्ध भाषांतरकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे तीन कवितासंग्रह, एक ललितलेख संग्रह, काही भाषांतरीत पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या केशवसुत काव्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कविता हिंदी, उर्दू, इंग्रजीत भाषांतरित झाल्या आहेत. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची सीनियर रिसर्च फेलोशिप त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांची चित्रकार म्हणूनही ओळख असून कोलकत्ता, पुणे येथे त्यांच्या चित्रांची स्वतंत्र प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. सध्या ते साने गुरुजी आंतरभारती सुविधा केंद्राच्यामायमावशीया नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. कवींनी काव्य वाचन कार्यक्रमात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी कल्पना मलये (9673438239) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.