|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजाराचा पाच दिवसांचा तेजीचा प्रवास थांबला

शेअर बाजाराचा पाच दिवसांचा तेजीचा प्रवास थांबला 

जागतिक स्तरावरील कमजोर संकेताचा  नफा परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग मागील पाच सत्रांपासून चालू असलेला भारतीय शेअर बाजारातील तेजीचा प्रवास अखेर सहाव्या सत्रात थांबला. जागतिक पातळीवर धातू, आर्थिक आणि ऑटो यांच्या क्षेत्रात कमजोरीची नोंद करण्यात आल्याचा परिणाम भारतीय बाजारावर मंगळवारी झाल्याचे पहावयास मिळाले. बीएसईचा मुख्य 30 कंपन्यांचा निर्देशांकात 134.32 अंकांवर घसरण होत 36,444.64 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात 39.10 अंकानी कमजोर होत 10,922.75 वर बंद झाला. सध्या बाजारात तिमाही विक्रीचे आकडे सादर करण्यात येत असल्याने सलग पाच दिवसांच्या सत्रात तेजीत व्यवहार झालेत गुंतवणूदारामध्ये समाधानकारक वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. या कालावधीत अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठीचे पोषक वातावरण निर्मिती केल्याची नोंद ही तज्ञांनी केली आहे.

दिवसभरातील व्यवहारादरम्यान नकारात्मक काळ तयार झाला आणि गुंतवणूकदारांमध्ये असलेला उत्साहाचे रुपातंर निराशेत होत गेले यांचा फटका बीएसईच्या निर्देशांकावर झाला. बाजाराला उतरती कळा सुरु झाली.

अर्थव्यवस्थेला चांगले दिवस आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून भारतीय विकासदरासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे. की आगामी दोन वर्षात भारताचा आर्थिक विकसदरात 7.7 दर राहणार असल्याचे नमूद केले आहे. तर दुसऱया बाजूला चीनचा आर्थिक विकासदर सर्वात खाली गेला असल्याची नोंद करण्यात आली आहे. यांचा परिणाम जगभरातील सर्व बाजारावर होणार असल्याची मते नोंदवण्यात येत आहेत. तर भारतीय विकासदरात समाधानकरक बदल होण्याचे संकेत सोमवारी आयएमएफकडून देण्यात आले आहे.

जागतिक स्तरांवरील विकासदरात 3 टक्क्यानी घट होणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. यात कच्च्या तेलासह अन्य व्यापारी क्षेत्रांतील उलाढालीचा प्रभाव शेअर बाजारातील घडामोडीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.