|Monday, March 25, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » फिरायला आली अन् 1800गायींची ‘आई’झाली ;जर्मन आजीची गोष्ट

फिरायला आली अन् 1800गायींची ‘आई’झाली ;जर्मन आजीची गोष्ट 

ऑनलाईन टीम / मथुरा :

जर्मनीहून एक महिला 25 वर्षांपूर्वी भारतात फिरायला आली अन् मथुरेतील गायींच्या प्रेमात पडली. मथुरेच्या रस्त्यावर अन् गल्ली-बोळातच ती रमली. प्रेडरिक एरिना ब्रूनिंग असे या महिलेचे नाव असून रस्त्यावर फिरणाऱया गायींची सेवा केल्यामुळे भारत सरकारने पद्मश्री देऊन तिचा सन्मान केला आहे.. उत्तर प्रदेशातील मथुरेत फिरताना भटकंती करणाऱ्या गायींचे हाल पाहून प्रेडरिक यांचे मन हेलावल. त्यामुळे परत जर्मनीला न जाता, आता मथुरेत राहून अशा गायींची सेवा करण्याचा धडसी निर्णय प्रेडरिक यांनी 25 वर्षांपूर्वी घेतला होता.

 

केंद्र सरकारने 25 वर्षांपासून भटकंती करणाऱया गायींची सेवा करणाऱया या गो-मातेचा सन्मान केला आहे. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये जर्मन नागरिक प्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. गजबजलेल्या लोकांच्या वस्तीपासून दूर एका शांत आणि गलिच्छ परिसरात प्रेडरिक यांनी 1800 पेक्षा अधिक गायी आणि त्यांच्या वासरांचा सांभाळ करत आहे. त्यामुळे, येथील स्थानिक लोके प्रेडरिक यांना सुदेवी माताजी असे म्हणतात. 61 वषीय प्रेडरिक ब्रुनिंग यांना 1800 गायींचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 35 लाख रुपयांचा खर्च येतो. कारण, या गोशाळेत 60 कर्मचारी काम करत आहेत. त्या 60 कर्मचाऱयांचे वेतन आणि येथील गायींच्या अन्न-पाण्यासाठी येणारा खर्च मोठय़ा प्रमाणात आहे. प्रेडरिक यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीतून दरमहा 6 ते 7 लाख रुपये मिळतात. या पुरस्कारामुळे मला अत्यंत आनंद झाला असून लोकांनी प्राणी मात्रांवर दया करावी, असा संदेश ब्रुनिंग यांनी देशातील नागरिकांना दिला आहे.

 

 

Related posts: