|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » ‘निवडणुका आल्या की प्रभू रामचंद्रांना उचकी लागते : तेजस्वी यादव

‘निवडणुका आल्या की प्रभू रामचंद्रांना उचकी लागते : तेजस्वी यादव 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राम मंदिराचा मुद्दा देशभरात गाजतो आहे, राम मंदिर होणार की नाही? हा प्रश्न आता सगळेच विचारू लागले आहेत. अशात आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे ‘स्वर्गात प्रभू रामचंद्र आणि सीतामाई बोलत असतात. तेवढ्यात प्रभू रामचंद्रांना उचकी लागते. सीतामाई विचारते की रामराया काय झाले? तुम्हाला उचकी का लागली? प्रभू रामचंद्र म्हणतात अगे निवडणुका जवळ आल्या आहेत भाजपाने आठवण काढली, त्यामुळे उचकी लागली.असे म्हणत राम मंदिराच्या प्रश्नावर तेजस्वी यादव यांनी भाजपावर टीका केली आहे.

राम मंदिर कधी होणार हे भाजपाने सांगितलेले नाही फक्त निवडणुका आल्या की भाजपाला प्रभू रामचंद्रांची आठवण येते असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर या देशात कुणालाही व्यक्त होण्याचा अधिकार उरलेला नाही. जी माणसे खरे बोलतात किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुरूंगात डांबले जाते किंवा त्यांना शिक्षा केली जाते. जेव्हा एखाद्या अन्यायाबद्दल प्रश्न विचारला जातो तेव्हा प्रश्न विचारणाऱया माणसालाच चुकीचे ठरवले जाते असे म्हणत तेजस्वी यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच पंतप्रधन नरेंद्र मोदी हे विसरले आहेत की ते चौकीदार असतील जनता ठाणेदार आहे असाही टोला यादव यांनी लगावला.