|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » प्रियंका गांधींची तुलना मोदींसोबत करणे अपमानास्पद : राहुल गांधी

प्रियंका गांधींची तुलना मोदींसोबत करणे अपमानास्पद : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील अधिक आक्रमकरित्या वारंवार अनेक मुद्यांवरुन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत.

प्रत्येकाला रोजगार, शेतकरी कर्जमाफी आणि बहीण प्रियंका गांधी-वाड्रा यांना सक्रीय राजकारणात प्रवेश देत राहुल गांधींनी आतापर्यंत अनेक मास्टरस्ट्रोक मारले आहेत. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, प्रियंका गांधी या केवळ पूर्वांचल भागापुरत्याच मर्यादित राहणार नसून त्या संपूर्ण देशात प्रचार करणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींच्या भूमिकेसहीत अंतरिम अर्थसंकल्प आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबाबत बोलताना राहुल म्हणाले की, ’’प्रियंका गांधी यांच्याकडे सरचिटणीसपद सोपवण्यात आल्याने, त्यांची राजकीय भूमिका केवळ एका भागापुरतीच मर्यादित नाहीय. त्यांच्याकडे सध्या एका कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, हे कार्य पूर्ण झाल्यानंतर दुसरे कामदेखील देण्यात येईल.’’ दरम्यान, प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशाबाबत राहुल गांधी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.