|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » फ्रान्सचा त्सोंगा दुसऱया फेरीत

फ्रान्सचा त्सोंगा दुसऱया फेरीत 

वृत्तसंस्था/ माँटेपिलेर

येथे सुरू असलेल्या सुद डी फ्रान्स पुरूषांच्या एटीपी टूरवरील खुल्या टेनिस स्पर्धेत यजमान फ्रान्सच्या त्सोंगाने एकेरीत विजयी सलामी देताना आपल्याच देशाच्या हंबर्टचा पराभव केला.

दुखापतीमुळे गेल्यावर्षी त्सोंगाला टेनिसपासून अलिप्त राहावे लागले होते. फ्रान्समधील सुरू असलेल्या स्पर्धेत सोमवारी त्सोंगाने हंबर्टचा 3-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करून दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. त्सोंगाचा दुसऱया फेरीतील सामना फ्रान्सच्या सिमॉनशी होईल. सिमॉनला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. अन्य एका सामन्यात ग्रेनोलर्सने क्रोएशियाच्या कार्लोव्हिकचा 7-6 (7-3), 6-7 (5-7), 7-6 (7-5) असा पराभव केला. स्पेनच्या ग्रेनोलर्सचा पुढील फेरीतील सामना कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हशी होणार आहे. चार्डीने स्पेनच्या मॅसेरेसवर 6-1, 6-1 अशी मात करत विजयी सलामी दिली.