|Monday, March 18, 2019
You are here: Home » उद्योग » पेट्रोलपंप एजन्सीसाठी 4 लाख निवीदा दाखल

पेट्रोलपंप एजन्सीसाठी 4 लाख निवीदा दाखल 

जमीन व अन्य नियमावलीत शिथिलतेमुळे 78,500 निवीदा दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारच्या ऑईल कंपन्यांनी पेट्रोल पंपाची एजन्सी देण्यासाठी जवळपास 78500 पंपाची एजन्सी घेण्यासाठी 4 लाख एजन्सी धारकांनी निवीदा दाखल केली आहे. यातून असे दिसून येते की पेट्रोल पंप व्यवसायाच्या माध्यमातून लोकप्रियता वाढत असल्याचे वातारण तयार होत आहे. हा असा व्यवसाय आहे की यात नियमीतपणे पैशाची मोठय़ा प्रमाणात उलाढाल करण्यात येते. यात निम्याहून अधिक पेट्रोल पंप चालवण्यासाठी इंडियन ऑईलने जाहिरात काढली आहे. ती अन्य कंपन्यांमध्ये कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

तेल कंपन्यांनी ज्या ठिकाणासाठी निवीदा मागविली होती. त्यातील 95 टक्के ठिकाणासाठीच्या निवीदा दाखल झाल्या आहेत. त्यातील 56 टक्के ठिकाणावर अनेक एजंटानी आपली निवीदा भरली असून अन्य 39 टक्के पंपासाठी एकच निवीदा दाखल करण्यात आली आहे.

जागेची विभागणी

आईल कंपन्यांच्या सादर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दोन समुहात विभागणी करण्यात आली आहे. पहिले यात जागेसाठी प्रथम बोली लावण्यात येते ती संबंधीत एजन्टाने जिंकली तर त्याची निवीदा पास करण्यात येते. आणि दुसऱया बाजूला समूहाचा लकी ड्रॉची पद्धत वापरुन संबंधीताची निवीदा अंतिम ठरवण्यात येणार आहे.

शिथिल नियमाचा परिणाम

मोठय़ा प्रमाणात जमीन आणि वित्तीय बाबांशी संबंधीत नियमामध्ये सवलत देण्यात आल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात 2014-15 मध्ये तेल कंपन्यांनी निवीदा मागविल्या होत्या तेव्हा एकूण निवीदापैकी 50 टक्केच जागेसाठी निवीदा दाखल करण्यात आल्या होत्या.

Related posts: