|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » जागतिक संकेतामुळे भारतीय बाजारात घसरण

जागतिक संकेतामुळे भारतीय बाजारात घसरण 

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन अमेरिका यांच्यातील व्यापारासंदर्भातील चर्चेमुळे पुन्हा तणावाचे वातावरण शुक्रवारी  निर्माण झाले यांचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजावर झाल्याचे पहावयास  मिळाले. दिवसभरातील व्यवहारत टाटा मोटर्सच्या  निर्देशांकात 17 टक्के घसरणीची नोंद करण्यात आल्याने बाजारात मोठी उदासिनता दिसून आली. महत्वाच्या कंपन्यांमध्ये धातू, ऑटो या कंपन्यावर आंतरराष्ट्रीय बाजरातील प्रभाव राहिला.

दिवसभरातील व्यवहारात भारतीय शेअर बाजार (बीएसई)चा निर्देशांक 424.61 अंकानी घसरण होत  36,546.48 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) चा निर्देशांक 125.80 वर पोहोचत 10,943.60 बंद झाला. शुक्रवारी बाजारात टाटा मोटर्सचा तिमाही विक्रीचा अहवाल सादर करण्यात आला यात कंपनीला नफा कमाईत घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या अहवालाचा परिणाम सेन्सेक्समध्ये होत 17.93 टक्क्यांनी कंपनीच्या निर्देशांकात घट झाली. यामुळेच तिमाही नफ्यात 26,960.8 कोटी रुपयांचा तोटय़ाची नोंद करण्यात आली या अहवालात चीनमधील जॅग्वारच्या विक्रीत सातत्याने झालेल्या नफ्यातील घटीचा परिणाम झाल्याचे नोंदवण्यात आले. कंपनीच्या एकूण

टाटा मोटर्स, वेदान्ता, एनटीपीसी, ओन्जस, एलऍण्डटी, महिंद्रा ऍण्ड  महिंद्रा, कोल इंडिया, मारुती सुझुकी, पॉवरग्रीड, ऍक्सिस बँक, आयटीसी आणि एचडीएफसी यांच्या निर्देशांकात 5.75 टक्के घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. काही प्रमाणात कोटक महिंद्रा, भारती एअरटेल, एचसीएल टेक, बजाज फायनान्स आणि हीरोमोटो यांच्या निर्देशांकात 0.95 टक्क्यांनी तेजी नोंदवण्यात आली.