|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य…

राशिभविष्य… 

मेष

कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवता येईल. लोकांच्यासाठी चांगले काम करून दाखवता येईल. धंद्यात लक्ष द्या. वेळकाढू धोरण ठेवू नका. कष्ट करा. फायदा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळखीमुळे चांगले कामही मिळेल. घरातील तणाव कमी होईल. रविवारी रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. विद्यार्थ्यांनी या वर्षात पास होण्यासाठी जास्त अभ्यास करावा.


वृषभ

सप्ताहात कामे करून घ्या. सोमवार, मंगळवारी संसारात वाद होईल. खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका. शेजारी तुमच्या विरोधात जाईल. कुंभेत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. संयमाने प्रकरण हाताळा. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांची मर्जी राखा. नोकरीत वर्चस्व राहील. कायद्याच्या विरोधात जाऊन  काम करू नका. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनतच होईल. परीक्षेसाठी सरळ मार्गे अभ्यास करा.


मिथुन

कुंभेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. बुधवार, गुरुवारी राजकीय- सामाजिक कार्यात उतावळेपणाने वागू-बोलू नका. गैरसमज वाढेल. धंद्यात प्रगती करता येईल. नवीन ओळख होईल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत तत्परता ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात महत्त्व टिकेल. कोर्टकेस सोपी नाही. घरातील व्यक्तीची काळजी राहील. अभ्यासात टंगल-मंगळ करू नका.


कर्क

कुंभ राशीत सूर्य राश्यांतर, मंगळ, हर्षल युती होत आहे. शुक्रवार, शनिवार तुमचा अपमान करण्याचा कट रचला जाईल. शाब्दिक चकमक होईल. हाणामारी करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे बोला, कृती करा. लोकांची तुमच्याबद्दल नाराजी दिसू शकते. संसारात तणाव होईल. जीवनसाथीमुळे यांच्यात मतभेद होतील. वाटाघाटीत समस्या येईल. धंद्यात गोड बोलून कामगारांच्या बरोबर रहा. विद्यार्थ्यांनी सरळमार्गाने रहावे. प्रेमात वाहवत जाऊ नये.


सिंह

कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. रविवार तुमचा संताप होईल. वाहन जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी मनाप्रमाणे घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात चूक सुधारता येईल. नोकरीत सावध रहा. घरगुती समस्या सोडवणे सोपे नाही. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. काम शोधता येईल. कोर्टाच्या कामात अडचण येऊ शकते. विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी कष्ट घ्यावे लागतील.


कन्या

कुंभ राशीत सूर्य प्रवेश, मंगळ, हर्षल युती होत आहे. सोमवार, मंगळवारी तुमच्या मनाविरुद्ध काम करावे लागेल. राग वाढेल. हायब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. वाहन जपून चालवा. कायद्याला कमी समजू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवण्यासाठी मेहनत घ्या. चुका करू नका. पोलीस केस टाळा. कला, क्रीडा क्षेत्रात धाडस नको. दुखापत होऊ शकते. संसारात अस्थिरता वाढेल. विद्यार्थीवर्गाने वाकडी वाट धरू नये.


तुळ

कुंभेत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. संमिश्र स्वरुपाच्या घटना  राजकीय-सामाजिक कार्यात घडतील. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. धंद्यात प्रयत्नाने यश मिळेल. मागील येणे वसूल करता येईल. शेतकरी वर्गाने नक्या पद्धतीने शेतीकाम करावे. खते मात्र जुन्या पद्धतीची वापरावी. तुमचा ठसा उमटवावा. संसारात मोठी खरेदी कराल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगतीची संधी मिळेल. बुधवार, गुरुवार सावध रहा.


वृश्चिक

कुंभ राशीत सूर्य प्रवेश, मंगळ, हर्षल युती होत आहे. विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न कराल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. तुमच्यावर टीका होईल. धंद्यात सावधपणे काम करा. अंदाज घेतांना घाई नको. शेअर्समध्ये जास्त मोह ठेवू नका. संसारात सर्वांना खूष ठेवण्याचा प्रयत्न कराल. कला, क्रीडा क्षेत्रात नवीन काम मिळेल. परीक्षेसाठी चांगला अभ्यास करा. मोठे यश मिळवता येईल. शेतकरी वर्गाला मार्ग मिळेल.


धनु

कुंभेत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. बुधवार, गुरुवारी तणाव होईल. पोटात उष्णता वाढू शकते. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. आळस करू नका. व्यवसायात काम मिळेल. वेळेच्या वेळी काम पूर्ण केल्यास फायदा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. नातलगांच्या भेटी होतील. आनंदी रहाल. परीक्षेसाठी अभ्यास करा. तरच पुढे याल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरी मिळू शकेल.


मकर

मकरेच्या धनस्थानात सूर्य प्रवेश, मंगळ, हर्षल युती होत आहे. घरगुती जीवनात वाद, तणाव होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. कायदा मोडू नका. धंद्यात चांगली संधी येईल. विचार करून निर्णय ठरवता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात खंबीर निर्णय घेता येईल. आक्रमकपणावर नियंत्रण ठेवा. कला- क्रीडा क्षेत्रात नाव होईल. अभ्यासात लक्ष द्या. मैत्रीत सावध रहा. फसगत होऊ शकते.


कुंभ

तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्यातील अडचणी दूर करता येतील. शेतकरी वर्गाला नवा मार्ग मिळेल. कष्ट घेतल्याचे समाधान यावर्षात मिळेल. राजकीय-सामाजिक कार्याला सप्ताहाच्या शेवटी गती मिळेल. घरात शुभवार्ता समजेल. वाहन, घर, जमीन खरेदीचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात आश्वासन मिळेल. नोकरीत बदल करता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.


मीन

कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात लक्ष द्या. थकबाकी वसूल करा. खर्च वाढू शकतो. प्रवासात सावधपणे वागा. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वाच्या मदतीने निर्णय घ्या. अरेरावी करू नका. घरातील व्यक्तींची मर्जी राखता येईल. खरेदी-विक्री सावधपणे करा. तरीही फायदा करून घेता येईल. कोर्टाच्या कामात संयम ठेवा.