|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » पोलीस चकमकीत दरोडेखोर ठार

पोलीस चकमकीत दरोडेखोर ठार 

ऑनलाईन  टीम  / सोलापूर :

सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावानजीक पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. तर उर्वरित पाच दरोडेखोर पळून जाण्याचा यशस्वी झाले. 

पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या पाच साथीदारांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यांच्यावर अश्विनी या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. मृत दरोडेखोराचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात पोहोचलेत. तिथे त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे.