|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » …म्हणून अमोल पालेकरांनी भाषण थांबवले

…म्हणून अमोल पालेकरांनी भाषण थांबवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ  अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावे लागल्याची घटना घडली होती. या संतापजनक प्रकाराबद्दल अमोल पालेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रभाकर बर्वे या चित्रकाराच्या प्रदर्शनासाठी मी नॅशनल गॅलरी ऑफ ऑर्ट येथे गेलो होतो. त्यावेळी मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे. पण, मी आर्ट गॅलरीबद्दलचा बोलत होतो, तरीही मला थांबविण्यात आल्याचे पालेकर यांनी म्हटले.

मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाविरोद्ध आपली भूमिका मांडली होती, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरने त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरने त्यांना बऱयाचदा रोखले. तर, भाषण लवकर संपवण्यासही सांगितले होते. सरकारी प्रतिनिधीच्या या प्रकाराबद्दल एखाद्या वक्त्याला तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे, की काय बोलायचे आणि काय नाही. त्यामुळे हे किंवा ते बोलू नका, असे सांगणे चुकीचे आहे. एनजीएमए संस्था आणि त्यामध्ये झालेले बदल याबद्दल बोलणे हे चुकीचे कसे ठरेल. या संग्रहालयात प्रभाकर बर्वेंचे प्रदर्शन हे कदाचित शेवटचे प्रदर्शन ठरण्याची शक्मयता आहे. कारण, आता ज्या नवीन डिरेक्टर आल्या आहेत. त्यांच्या धोरणानुसार, त्यामध्ये चार मजले हे एनजीएमएच्या कलेक्शनसाठी वापरायचे आणि उर्वरीत एक मजला इतर प्रदर्शनासाठी देण्याचा निर्णय झाल्याची मला माहिती आहे. त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या कलावंतांना हा मोठा धक्का असल्याचं पालेकर यांनी म्हटले. तसेच पूर्वनियोजत दोन विख्यात कलाकारांचे प्रदर्शनही ऐनवेळी रद्द करण्यात आले आहेत, मी त्याबद्दलच बोलत होतो, असेही पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.