|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडी रेल्वे स्थानकातून नेपाळी युवक बेपत्ता

सावंतवाडी रेल्वे स्थानकातून नेपाळी युवक बेपत्ता 

सावंतवाडी:

नेपाळ गोलमी येथील वीसवर्षीय युवक सावंतवाडी रेल्वे स्थानक येथून बेपत्ता झाला आहे. तिलक ओम घरती असे त्याचे नाव आहे. या बाबतची तक्रार भाऊ भीमबहाद्दूर घरती याने आज पोलीस ठाण्यात दिली.

तिलक घरता हा केरळ येथे आपल्या नातेवाईकांसमवेत हॉटेलात कामाला होता. तिलक याची प्रकृती बरी नसल्याने नातेवाईक बीरबहाद्दूर पून हा त्याला ओखा एक्स्प्रेस रेल्वेने केरळ ते मुंबई असे भावाकडे घेऊन जात होता. 8 फेब्रुवारी रोजी रेल्वे सावंतवाडी स्टेशन येथे थांबली असता तिलक हा युवक उतरला. मात्र, पुन्हा रेल्वेत चढला असावा, असा अंदाज नातेवाईकाने घेतला. रेल्वे मुंबई येथे पोहचल्यानंतर तिलक हा युवक दिसून आला नाही. या बाबतची माहिती मुंबई-नालासोपारा येथे राहणारा भाऊ भीमबहाद्दूर घरती याला देण्यात आली. शोध घेऊन सापडला नाही म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.