|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पाणी म्हणून डिझेल पिलेल्या चिमुकल्याचा मृत्यू

पाणी म्हणून डिझेल पिलेल्या चिमुकल्याचा मृत्यू 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ट्रक्टरसाठी बाटलीतून आणलेले डिझेल दोन दिवसांपुर्वी समर्थ शरद मदने (वय सव्वावर्षे) याने पाणी म्हणून प्राशन केले. त्याला त्रास सुरू झाल्यानंतर सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रविवारी सायंकाळी उपचार सुरू असता या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

  जाखले येथे शरद मदने राहतात. त्यांचा ट्रक्टर आहे. ट्रक्टरसाठी ते बाटलीतून डिझेल घेऊन आले होते. ही बाटली त्यांनी दाराजवळ ठेवली होती. 14 महिन्यांचा समर्थ रांगत त्या बाटलीकडे गेला. त्याने पाणी म्हणून डिझेलची बाटली तोंडाला लावली. डिझेल पोटात गेल्याने तो अत्यवस्थ झाला. त्याला उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले होते. रविवारी सायंकाळी उपचार सुरू असता समर्थ मदने या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रात्री उशिरा वारणा कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.