|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सीमालढय़ाचा आवाज तरुण भारतमुळे बुलंद

सीमालढय़ाचा आवाज तरुण भारतमुळे बुलंद 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे मत

प्रतिनिधी/ सोलापूर ‘

सीमावासियांचा बुलंद आवाज म्हणून तरूण भारत कार्यरत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापासून बेळगावचा तरूण भारत मराठी भाषिकांचा आवाज पोहोचवत आहे. महाराष्ट्रातील इतर वर्तमानपत्रांनी मराठी भषिकांकडे दुर्लक्ष केले मात्र, स्व. बाबुराव ठाकुर यांनी व पुढे किरण ठाकुर यांनी सीमालढय़ात तरूण भारतची ‘एकला चलो रे…’ ची भूमिका जोपासली असली तरी सीमा लढय़ाचा आवाज तरुण भारतमुळेच बुलंद असल्याचे उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काढले.

तरूण भारत संवादच्या सोलापूर आवृत्तीच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात शिंदे बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर तरूण भारत संवादचे समुह प्रमुख सल्लागार किरण ठाकुर, आ. बच्चू कडू, संपादक मंगेश मंत्री उपस्थित होते.

वर्धापन †िदनानिमित्त वाचक स्नेहमेळाव्याचा प्रारंभ तरूण भारतचे संस्थापक संपादक स्व. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे म्हणाले, तरूण भारतची आपली ओळख स्व. बाबुराव ठाकुर यांच्या संपादकीय कारकीर्दीपासून आहे. आजपर्यत तरूण भारतने सामाजिक आणि राजकीय विकृतीची चिरफ्ढाड करण्याचे कार्य केले आहे. तरूण भारत बेळगाव हे नाव ऐकल्यावर निश्चितच सीमावर्ती लढाच पुढे येतो. या लढय़ामध्ये आचार्य अत्रे, कॉ. डांगे यांचा तरूण भारत प्रमाणे झंझावात होता. त्यावेळी आपण पोलीस अधिकारी म्हणून सीमालढयाच्या सभाचा अहवाल करीत असल्याची आठवणही त्यांनी व्यक्त केली.

आ. बच्चू कडू म्हणाले, तरूण भारतने अन्यायाविरुद्ध झुंज देणाऱयाच्या पाठींशी उभे राहणारे वृत्तपत्र आहे. आज बातमीची व्याख्या माध्यमक्षेत्रात बदलत जात आहे. मात्र तरूण भारत निस्पृह पत्रकारितेचा बाणा जपत असल्याचे गौरवौद्गार काढले. 

यावर्धापन दिन सोहळयासाठी सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, आ. सिध्दाराम म्हेत्रे, माजी आ. निर्मलाताई ठोकळ, आ. प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शिवसेनेचे पुरूषोत्तम बरडे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष विनोद भोसले, सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलसचिव प्रा. घुटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तरूण भारत संवादचे संपादक मंगेश मंत्री यांनी केले. स्वागत आवृत्तीप्रमुख शिवाजी भोसले यांनी केले. याप्रसंगी वाचकांनी तसेच हिंतचितक, वार्ताहर यांनी तरूण भारत संवादवर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

सीमालढा सोडवू शकलो नाही : सुशिलकुमारांची खंत

बेळगावच्या मराठी भाषिकांच्या लढय़ासाठी किरण ठाकुर लढत आहेत. आपण 2004 मध्ये मुख्यमंत्री असताना बेळगावचा प्रश्न सुप्रीम कोर्टाकडे पाठवून मराठी भाषिकांच्या न्यायासाठी प्रयत्न केले. पण हा प्रश्न किचकट असल्याने कर्नाटकात तसेच केंद्रात कायमच वेगवेगळया पक्षांच्या सत्तेsत हा प्रश्न अडकलाय. पण या सर्वामध्ये आम्ही बेळगावप्रश्नी कमी पडलो. अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. 

       सीमावासियांना न्यायमिळेपर्यंत लढणार : किरण ठाकुर

तरूण भारतचे संस्थापक संपादक स्व. बाबुराव ठाकुर यांनी स्वातंत्र्यलढय़ात कार्य केले. पुढे गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. मात्र यामध्ये बेळगाव, कारवार, भालकी हे कर्नाटकातच राहिले. त्यामुळे परत मराठी भाषिकांसाठी लढा सुरू झाला. आपण त्यावेळी वडिलांना विचारले अजून किती वर्षे लढायचे, त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितले, परिस्थिती आहे तोपर्यत लढायचे त्याच शिकवणीतून आजही आपण मराठी भाषिकांसाठी लढत असुन सीमावासियांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवू, असा विश्वास यावेळी तरूण भारतचे समुहप्रमुख सल्लागार किरण ठाकुर यांनी व्यक्त केला. तरूण भारतमध्ये आजपर्यत स्व. बाबुराव ठाकुर यांनी अन्यायाविरूध्द लढा देत असताना, शिक्षणासारख्या क्षेत्रातूनही विधायक कार्य केले. हाच वारसा जपत आजही तरूण भारत आणि लोकमान्यच्या माध्यमातून आम्ही अनेक गावं दत्तक घेत आहोत, रोजगार उपलब्ध करत असल्यांचेही ठाकुर यांनी सांगितले.

Related posts: