|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विजय सरदेसाई, रोहन खंवटे पॉलिटिकल ठग

विजय सरदेसाई, रोहन खंवटे पॉलिटिकल ठग 

प्रतिनिधी/ पणजी

वागातोर येथे येत्या दि. 23 व 24 रोजी होणाऱया ‘सनबर्न क्लासिक ईडिएम’ महोत्सवाला सरकारने दिलेली मान्यता त्वरीत रद्द करावी अशी मागणी विविध हिंदू संघटनेतर्फे रविवारी आझाद मैदान येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाखाली आयोजित आंदोलनात करण्यात आली.

गोवा सरकारने या महोत्सवाला मान्यता दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सनबर्नसारखे महोत्सव आमच्या युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे व राज्यात पाश्यात संस्कृती रुजविणार आहे. सरकारला हे चालते का? असा प्रश्न यावेळी रणरागिणी संघटनेच्या राजश्री गडेकर यांनी उपस्थित केला.

सरकारने नुकताच विधानसभेत समुद्रकिनाऱयावर व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या महोत्सवाच्या माध्यमातून समुद्रकिनाऱयावर मद्यपान व आमलीपदार्थांचा खुलेआम वावर होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या हितासाठी सरकार तडजोड करायला तयार आहे असे दिसून येते. असेही राजश्री गडेकर यांनी पूढे बोलताना सांगितले. यावेळी गोपाळ बंडीवड, सत्यविजय नाईक, चोडणकर, शुभा सावंत यांचीही सनबर्न व शासनाविरुद्ध भाषणे झाले.

या महोत्सवाची मान्यता त्वरीत रद्द करावी असे निवेदनसुद्धा यावेळी हिंदू जनजागृती समीतीतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर, जिल्हाधिकारी व पोलिस महानिरीक्षकांना देण्यात आल्याचे यावेळी सांगितले.

आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनामध्ये राष्ट्रप्रेमी नागरिक पेडणे, ग्राम रक्षक दल मये, रणरागिणी शाखा, मंदिर महासंघ समिती व सनातन संस्थेच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेशा गडेकर यांनी केले.