|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंग्रियाच्या डेकवर बाबा धोंड यांना शतकोत्सवाच्या सदिच्छा

आंग्रियाच्या डेकवर बाबा धोंड यांना शतकोत्सवाच्या सदिच्छा 

नव्वदावा वाढदिवस आंग्रिया परीवार, सहकारी, आप्तेष्ठांसह उत्साहात साजरा

ंप्रतिनिधी/  वास्को

लोकमान्य मल्टीपर्पज कॉ ऑपरेटीव्ह  पेडीट सोसायटीचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग उर्फ बाबा धोंड यांचा नव्वदावा वाढदिवस आंग्रिया जहाजाच्या डेकवर मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशस्त आणि अलिशान आंग्रिया जहाजाच्या डेकवर रविवारी रात्री वाढदिवसाचा छोटेखानी समारंभ मुरगाव बंदरात आयोजित करण्यात आला होता. आंग्रिया परीवार, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परीवार आणि बाबा धोंड यांचे जुने सहकारीही या समारंभात सहभागी झाले होते.

  लोकमान्य आणि आंग्रिया परीवाराचे तसेच त्यांच्या सहवासातील सर्वांचेच प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेले पांडुरंग धोंड यांनी नव्वदी पार केल्याचा उत्साह आंग्रियाच्या डेकवर रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या चाहत्यांमध्ये होता. या छोटेखानी समारंभात बाबांचे मेहणे तसेच तरूण भारतचे सल्लागार व समुह संपादक  किरण ठाकूर यांच्यासह बाबा धोंडची मुले, नातवंडे, नातेवाईक, आंग्रिया परीवार, त्यांचे जवळचे सहकारी अशी बरीच उत्साही मंडळी सहभागी झाली होती. सर्वांचेच लाडके बाबा असलेले पांडुरंग धोंड आपल्या मुळ सदा बहार स्वाभावानुसार  वाढदिवसाच्या उत्साहात एकरूप झाले होते. नाच गाणेही रंगले. आंग्रियाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनीही वाढदिवसाच्या उत्साहात ठेका धरला. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह होता.

     वाढदिवसानिमित्त बाबांचे नव्वद  वर्षांचे आयुष्य कसे घडले, कशा प्रकारे त्यांनी यशस्वी वाटचाल केली, नोकरी व्यवसाय, सार्वजनिक जीवनातील सहभाग, विदेशवाऱया, त्यांच्या जीवनातील अनेक किस्से, आठवणी  या साऱयांना sंउजाळा देण्यात आला. चर्चा आणि हास्य विनोदातून थोडक्यात मांडण्यात आलेला त्यांचा जीवन प्रवास आंग्रियाच्या डेकपर्यंत येऊन थांबला.  त्यांच्या मुलांनी आणि सहकाऱयांनीही अनेक आठवणींना उजाळा देत वाढदिवसाच्या उत्साहात रंग भरले. धोंड यांनी स्वताच अनेक आठवणी सांगत समारंभात हास्य फुलवले. बाबा धोंड आपल्या नव्वदाव्या वाढदिवसातही तरूणासारखेच उत्साहाने वावरत होते. त्यांच्यासाठी दिर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी त्यांच्या सहचारीणी नलुताईही सोबतीला होत्या.