|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News »  ‘ज्याला चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्याला जनतेने पंतप्रधान बनवले’

 ‘ज्याला चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्याला जनतेने पंतप्रधान बनवले’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हटले  जाते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्यानं अनेकांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता.

आता पोस्टरच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. मालवीयने लिहिले आहे, विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणे हा अभिशाप आहे काय ?, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू मोदी सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणावर बसले आहेत. मोदी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबूंनी लावून धरली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशातील रॅली झाल्यानंतर दुसऱया दिवशी लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली. ’जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहीत आहे. हा आंध्र प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल, आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा’, असा शब्दांत चंद्राबाबू नायडूंनी इशारा दिला आहे. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.